

Dharavi Depot BEST Bus Accident
ESakal
मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील बेस्टची बस बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी धारावी डेपोमध्ये अपघातग्रस्त झाली. हा अपघात दुपारी घडला आणि डेपो परिसरात घबराट पसरली. सुरुवातीच्या वृत्तानुसार, बस नियंत्रणाबाहेर गेली आणि डेपोच्या एका भागावर आदळली. ज्यामुळे मोठे नुकसान झाले. या घटनेत दोघे जखमी झाले आहे. घटनास्थळावरील फुटेज आणि व्हिडिओंमध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. धडक इतकी भीषण होती की डेपोच्या परिसरात काचेचे तुकडे पसरले होते.