

Mankhurd BEST Bus Accident
ESakal
मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे सोमवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. बेस्टची भरधाव बस थेट दुभाजकावर (डिव्हायडर) आदळल्याने, तिथे उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात बसचे चालक-वाहक आणि अन्य ५ प्रवासी असे एकूण ७ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.