
मुंबई : मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. यासाठी राज्यातील अनेक ठिकाणाहून मराठा बांधव उपस्थित आहेत. दरम्यान आज या उपोषणाचा चौथा दिवस असून दिवसेंदिवस मराठा आंदोलकांचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील प्रमुख भागात रस्ते बंद करण्यात आले असून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.