'बंद'दरम्यान मुंबईत बस फोडली, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

मुंबई - NPR म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायदा या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यामध्ये ३५ वेगवेगळ्या संघटनांनी वांछितने पुकारलेल्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान मुंबईत वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळतंय. मुंबईतील चेंबूर परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आली आहे. काही तोंड झालेल्या आंदोलकांनी या बसवर दगडफेक कार्यात आली.      

मोठी बातमी - फोन टॅपिंगवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा, भाजपच्याच मंत्र्याने..

दरम्यान ही घटना घडली आहे मुंबईतील चेंबूरमधील स्वस्तिक पार्क भागात. बस सुरु असताना बस ३६२ नंबरच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये बसचालकाच्या हातात काचेचे तुकडे गेल्याने बस ड्रायव्हर जखमी झालेत. बस ड्रायव्हर विलास दाभाडे यांच्यावर गोवंडीयेथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

मोठी बातमी - ​ "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया 

दरम्यान, या बसफेडीवर आणि आज पुकारण्यात आलेय 'बंद'वर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा बंद म्हणजे कर्फ्यू नाही. यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कुणालाही जबरदस्ती केली नाही, या बंदमध्ये लोकं स्वच्छेने सहभागी झालेले आहेत. आम्ही जे काही करतो ते उघडपणे करतो, आम्ही तोंडाला रुमाल लावून ओळख लपवत नाही. चेंबूरमधील बसफेडीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणालेत, चेंबूरमध्ये जी बस फोडली गेली त्यात तोंडावर  रुमाल बांधलेला होता. त्यामुळे आमच्या आंदोलनाकडून ही बस फोडली गेलेली नाही. RSS ने आपलं कॅडर ऍक्टिव्ह केलं आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणालेत. 

best bus vandalized in chembur area of mumbai see what prakash ambedkar is saying

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best bus vandalized in chembur area of mumbai see what prakash ambedkar is saying