आता मेट्रो स्थानकापासून घर किंवा कार्यालयापर्यंत थेट बस सेवा !  बेस्टचा पॅटर्न बदलणार

आता मेट्रो स्थानकापासून घर किंवा कार्यालयापर्यंत थेट बस सेवा !  बेस्टचा पॅटर्न बदलणार
Updated on

मुंबई, ता.10 : बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी नव नवे प्रयोग केला जात आहेत. आतापर्यंत बेस्टचा वापर घरातून थेट कार्यालय तसेच कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी वापर केला जात होता. मात्र, आता मेट्रो स्थानक ते घर अथवा कार्यालय अशा प्रवासासाठी बेस्ट बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे. परदेशातील अनेक शहरांमध्ये सार्वजनिक बसेस, मेट्रो आणि रेल्वे यांची स्थानके बाजू बाजूलाच आहेत.

लोकल ट्रेन बंद असताना बेस्टचे महत्व अधोरेखीत झाले आहे. बेस्ट बसेसाच वापर आता पुन्हा लांबच्या प्रवासासाठीही होऊ लागला आहे. मात्र, लोकल सेवा सुरु झाल्यानंतर बेस्टच्या प्रवाशी संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता बेस्ट वाहतुकीचा पॅटर्न बदलण्याचा विचार पुढे आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्ट अर्थसंकल्पावर बोलताना तशी सुचना केली आहे.

मेट्रो आणि माेनो स्थानकांच्या परीसरातून बेस्ट बसेस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन प्रवाशांना मेट्रो स्थानकावरुन घरी किंवा कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांऐवजी बेस्टच्या सार्वजनिक सेवेचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतुक कोंडीही कमी होईल तसेच बेस्टलाही उत्पन्न मिळू शकेल, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.

मुंबईतील  घाटकोपर, अंधेरी, वर्सोवा या मार्गावर 12 मेट्रो स्थानके आहेत. तर, सध्या सुरु असलेल्या मेट्रोच्या विविध टप्प्यांमध्ये 129 स्थानके प्रस्तावित आहे. या स्थानकांच्या परीसरातून कार्यालयांमध्ये अथवा निवासी वसाहतीपर्यंत बस सेवा सुरु केल्यास त्याचा प्रवाशांबरोबरच बेस्टलाही उत्पन्न वाढीसाठी फायदा होईल. परदेशातील अनेक शहरांमध्ये ‘ट्रान्सपोर्ट इंटरचेंज’ पध्दत वापरली जाते. यात रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि बस स्थानके आजू बाजूलाच असतात. बेस्ट उपक्रमाकडूनही असाच प्रयत्न केला जात आहे.

सुरवातीच्या काळात बेस्टचा लोकलला पर्याय म्हणून वापर केला जात होता. मात्र, गेल्या एक ते  दिड दशकात रस्त्यावरील वाहतुक कोंडी, बसेसची कमी झालेली संख्या तसेच वाढलेले तिकीट दर यामुळे बेस्टचा वापर घरातून अथवा कार्यालयातून रेल्वे स्थानकापर्यंत करण्यासाठी वापरु लागला आहे. पुर्वीच्या तुलनेने आता बेस्टचे तिकीट कमी झाले आहे. तर, येत्या काही वर्षात बेस्टचा ताफ 6 हजार 800 पर्यंत वाढविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या दृष्टीनेही बेस्टच्या वाहतुकीचा विचार करता येऊ शकतो असे बेस्टच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

( संपादन - सुमित बागुल )

BEST buses to change their routs commuters will get local bus services from metro to home or offices

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com