

Electric Double Decker BEST Bus
ESakal
मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी बेस्टने महायोजना सुरु केली आहे. यामध्ये ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक डबल-डेकर बेस्ट बसेस सुरू केल्या जाणार आहेत. बेस्टच्या या उपक्रमामुळे दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरे आणि नवी मुंबई यांच्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.