बेस्टची वीज थकबाकी तत्काळ भरण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - थकलेले वीजबिल वसूल करण्यासाठी बेस्टने वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर महानगरपालिकाही खडबडून जागी झाली आहे. वीजबिलापोटी बेस्टची तब्बल 38 कोटी रुपयांची थकबाकी सरकारी कार्यालयांकडे आहे. त्यातील 11 कोटी रुपये महानगरपालिकेने थकवले असून ते तत्काळ भरण्याचे आदेश आज पालिका आयुक्तांनी दिले आहेत. राज्य सरकारकडे बेस्टचे तब्बल 23 कोटी रुपये थकले आहेत.

तोट्यात असलेल्या बेस्टला कोणतीही मदत मिळत नसताना त्यांची तब्बल 38 कोटी रुपयांची वीजबिले केंद्र व राज्य सरकार तसेच महानगरपालिकेने थकवले आहेत. आतापर्यंत बेस्टने कधीच वसुलीसाठी कारवाई केली नव्हती. मात्र आता आर्थिक तोटा सहन करण्यापलिकडे गेल्यामुळे बेस्टने काही दिवसांपूर्वीच आमदार निवासाचा वीजपुरवठा बंद केला होता. त्यानंतर महानगर पालिकेलाही जाग आली. पालिकेची 11 कोटी रुपयांची थकबाकी तत्काळ भरण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पालिकेने बेस्टचे अनेक वर्षांचे वीजबिल थकवले आहे; मात्र बेस्टकडून सर्व कर वसूल केले जातात. बेस्टच्या आवारात केलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीचे लाखो रुपये महानगरपालिकेने वसूल केले होते.

थकबाकीदार थकबाकी
राज्य सरकार - 23 कोटी 87 लाख
महापालिका - 11 कोटी 38 लाख 98 हजार 257 रुपये
खासगी ग्राहक - 10 कोटी 37 लाख 18 हजार 358
केंद्र सरकार - 3 कोटी 12 लाख

Web Title: best electricity bill immediate paid order