Best Employee Strike: आमची दिवाळी 'बेस्ट' करा; कंत्राटी कर्मचारी संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best

Best Employee Strike: आमची दिवाळी 'बेस्ट' करा; कंत्राटी कर्मचारी संपावर

मुंबई : मुंबईतील सांताक्रुझ बेस्ट बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांना ऐन सणासुदीत त्रास सहन करावा लागत आहे. तर पगारवाढ आणि दिवाळी बोनस न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचंही या संपकऱ्यांनी सांगितलंय.

(Mumbai Best Employee Protest Latest Updates)

दरम्यान, कंत्राटी कामारांना दिला जाणारा पगार हा समान काम समान वेतन याप्रमाणे मिळत नाही. त्याचबरोबर दिवाळी बोनस दिला जात नाही. याव्यतिरिक्त अजूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज अचानक संप सुरू केला आहे. बेस्टचे अधिकारी या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले आहेत पण ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना फटका बसला आहे.

हेही वाचा: Farmers Diwali : उसवलं गणगोत सारं... आधार कुणाचा नाही

"आम्हाला दिवाळी बोनस, पगारवाढ, जॉईनिंग लेटर, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास या आमच्या प्रमुख मागण्या असून या मान्य व्हायला पाहिजेत. आम्ही येथे पहाटे पाच वाजल्यापासून बसलो आहोत आणि आणचे डीएम आत्ता आले आहेत. यावरूनच त्यांची आमच्यापोटी असलेली काळजी कळते" असं संपकरी कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.