मुंबईत कोरोनाचा उद्रेक; BEST ने उचललं 'बेस्ट' पाऊल| Mumbai news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best bus
मुंबईत कोरोनाचा उद्रेक; BEST ने उचललं 'बेस्ट' पाऊल

मुंबईत कोरोनाचा उद्रेक; BEST ने उचललं 'बेस्ट' पाऊल

मुंबई : मुंबईत कोरोनाचा (corona patients) विस्फोट झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांनी वीस हजारांचा (more than twenty thousand corona patients) टप्पा पार केलाय. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाटेचं चित्र निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बेस्टने (Mumbai Best) दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची तपासणी मोहीम सुरु केलीय. मुंबई शहर व उपनगरात प्रवाशांच्या युनिव्हर्सल पासची (Universal vaccination pass) काटेकोर तपासणी करण्याचं बेस्ट पाऊल बेस्टने उचललं आहेत. सकाळी आणि सायंकाळी बेस्टमध्ये प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. (Best started checking universal vaccination pass of commuters in mumbai on corona issue)

हेही वाचा: मुंबई : तलवारीनं केक कापला, बर्थ डे बॉय जेरबंद

मुंबईत बेस्टच्या माध्यामातून युनिव्हर्सल पासशिवाय जाणाऱ्या प्रवाशांची नोंद केली जात आहे. बेस्टमध्ये असणाऱ्या वाहकाकडून युनिव्हर्सल पास तपासलं जात असल्यानं प्रवाशांनाही आश्चर्य वाटत आहे. यासंदर्भात बेस्टचे अधिकारी मनोज वराडे यांनी असं म्हटलयं की, बेस्टच्या माध्यामतून मुंबईतील कोलाबा, वडाला, मुंबई सेंट्रल तसेच अन्य ठिकाणच्या बस स्थानकांत प्रवाशांच्या लसीतकरणाची तपासणी मोहीम सुरु आहे.

अनेक प्रवासी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेला युनिव्हर्सल पास दाखवतात. तसंच काही प्रवासी लसीकरण प्रमाणपत्रही दाखवतात. बेस्ट कमिटी चेअरमन आशिष चेंबुरकर यांनी नुकतीच बेस्टमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांची लसीकरण तपासणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. तससं त्यांनी काही बस स्थानकांत भेट देऊन प्रवाशांसोबत चर्चाही केली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top