बदनामीसाठी बेस्ट संपाचा वापर - परब

Anil-Parab
Anil-Parab

मुंबई - शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कामगार नेते शशांक राव यांनी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांची मदत घेत बेस्टचा संप लांबविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. 

बेस्ट कामगारांना ७ हजार नव्हे, तर ३,४२८ एवढीच वेतनवाढ मिळणार असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. तसेच शशांक राव यांच्या मागे ३ जणांचे अदृश्‍य हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबई महापालिका आणि बेस्टवर शिवसेनेची सत्ता आहे. अनेक संघर्षात शिवसेनेने मध्यस्थीची भूमिका बजावली. मात्र संपाचे निमित्त करून शिवसेनेवर आरोप केले. आमची बांधिलकी मुंबईतील जनतेशी आणि कामगारांशी आहे, असे परब म्हणाले. जनता आणि कामगार यांच्यात सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com