
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी केवळ मुंबईतलेच नाही तर महाराष्ट्रासह देश-विदेशातूनही भाविक, पर्यटक गर्दी करतात. या काळात सार्वजनिक वाहतुकीवर ताण येतो. विशेषतः रात्री उशिरापर्यंत दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीची गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष बस धावणार आहेत.