संपापेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिलं सेवेला महत्व, 1500 पेक्षा अधिक बेस्ट ड्राइव्हर आणि कंडक्टर कामावर हजर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

महाराष्ट्रात कोरोनानं हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या मुंबई बेस्ट बसनंही एक मोठा निर्णय घेतला होता.

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनानं हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या मुंबई बेस्ट बसनंही एक मोठा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. पण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक ऐकली नाही आणि कामावर आल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. 

संपापेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेला महत्व दिल्यानं त्यांचं सगळीकडून कौतूक होतं आहे. महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सकाळी 8 वाजता 1500 पेक्षा अधिक बेस्ट ड्राइव्हर आणि कंडक्टर कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली. 

सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांनी कामावर न जाता लॉकडाऊनचं पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी सकाळी 60 टक्के कर्मचारी कामावर हजार झाले. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याचं समजतंय. 

बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अन्यथा संप करू असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता. बेस्ट प्रशासन कामगारांना सुरक्षा कवच देत नाही. तसंच स्वतंत्र उपचार सेवा देत नाही अशावेळी कामगारानं स्वतःचं रक्षण स्वतः करावं यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याचं आवाहन केलं होतं. गेल्या काही काळापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या ही परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या प्रवासासाठी बेस्टकडून जवळपास 1200 हून जास्त बस सेवेत रुजू करण्यात आल्या होत्या. पण, बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं तणाव वाढला. कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्येही बेस्ट कर्मचाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय.

अनागोंदी कारभाराची हद्द ! धारावीतल्या पॉझिटिव्ह कुटुंबाला सोडलं घरी सोडले घरी आणि पुढे जे घडलं...

बेस्टमध्ये काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 100 हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना सुरक्षात्मक साधन जसं मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे नाईलाजानं कृती समितीनं निर्णय घेतला असल्याचं कामगार नेत्यांचं म्हणणं आहे.

कामगारांना घरी राहण्याचं दिलं होतं आवाहन

मुंबईतील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सेवेत बेस्ट बसचा समावेश आहे. सध्या 1501 इतक्या मोठ्या प्रमाणावर बस रस्त्यावर चालत आहेत. या अत्यावश्यक सेवेसाठी बेस्टचे जवळपास 3260 कामगार काम करताहेत. बेस्ट वर्कर्स युनियनने आजपासून कामगारांना घरी राहण्याचं आवाहन केलं होतं.

best workers gave importance to give services in emergency strike called off


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best workers gave importance to give services in emergency strike called off