Mumbai News : गणेशोत्सव काळात 'स्टिंग रे', 'जेलीफीश' पासून सावधान; पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबईच्या चौपाट्यांवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा या काळात वावर आढळतो
Beware of sting ray jellyfish during ganeshotsav mumbai municipality appeal to citizens
Beware of sting ray jellyfish during ganeshotsav mumbai municipality appeal to citizenssakal

मुंबई - मुंबईच्या चौपाट्यांवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा या काळात वावर आढळतो. गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांनी जेलीफीशपासून सावधानता बाळगा असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज आहे. तसेच काही ठिकाणी १०८ रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावर वाढत असल्याचे आढळले आहे. मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो.

यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती मत्स्यव्यवसाय विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.

गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ‘डी’, ‘जी उत्तर’, ‘के पश्चिम’, ‘पी उत्तर’ आणि ‘आर मध्य’ या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते.

तसेच सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

Beware of sting ray jellyfish during ganeshotsav mumbai municipality appeal to citizens
Mumbai Crime News: वांद्रे टर्मिनसवरती तरुणाची हत्या, अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अशी घ्या काळजी

- गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.

- पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

- नागरिकांच्या जनजागृतीसाठी पालिकेच्या वतीने चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.

- लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.

- मत्स्यदंश आणि प्रथमोपचार

Beware of sting ray jellyfish during ganeshotsav mumbai municipality appeal to citizens
Mumbai News: मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, किंमत फक्त 9 लाख, असा करा अर्ज

- ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

- ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.

- जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.

- जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

- मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.

- जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com