Bhagat Singh Koshyari : पोलीस हुतात्म्यांचा अपमान नाही; आरोप द्वेषपूर्ण आणि खोडसाळ

पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारकाला अभिवादन करताना पादत्राणे काढणे आवश्यक नसल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले होते.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal
Summary

पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारकाला अभिवादन करताना पादत्राणे काढणे आवश्यक नसल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले होते.

मुंबई - पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारकाला अभिवादन करताना पादत्राणे काढणे आवश्यक नसल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप द्वेषपूर्ण व खोडसाळपणाचा आहे असा खुलासा राजभवनतर्फे करण्यात आला आहे.

आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६  नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले. त्यावेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले. 

अलीकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते.  त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आजच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केले, असेही राजभवन तर्फे कळविण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com