BEST Bus Accident in Bhandup
esakal
सोमवारी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १३ निरपराध नागरिकांना चिरडल्याचा प्रकार घडला आहे. भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात चौघांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झालेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा आता समोर आला आहे. यात बसने रिव्हर्स गियरमध्ये येत नागरिकांनी चिरडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.