

Prashant shinde and varsha sawant killed in best accident
Esakal
मुंबई, ता. ३० : भांडुप अपघातास जबाबदार चालकाला अटक झाली, त्याच्यावर खटला चालेल, तो दोषी आढळून त्याला शिक्षाही होईल; पण विनाकारण, अकाली मृत्यू झालेली आमची माणसे परत येतील का? या अपघाताने हक्काचा माणूस गमावलाच; पण सोबत संपूर्ण कुटुंबाचा आधारही हरपला, अशा प्रतिक्रिया अपघातात मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. यातला प्रशांत शिंदे घरात एकटाच कमावता होता. वॉर्डनचं काम करणाऱ्या प्रशांतचा पत्नीशी फोनवर बोलता बोलता जीव गेला.