

Bhandup BEST Bus Accident
ESakal
मुंबई : महिनाभरापूर्वी मुंबईतील दादर प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसचा मोठा अपघात घडला होता. 'बेस्ट' बसने एक कार आणि दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले होते. मुंबईतील बेस्ट बस अपघाताचे हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा मुंबईतील भांडुप येथे बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.