
Bhandup News: मुंबईतील भांडुप परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भूतबाधा झाल्याचे कारण पुढे करत एका दांपत्याने आपल्या मोलकरणीच्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाला अमानुषपणे चटके दिले आणि छडीने मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांनी मुलाच्या आईला, म्हणजेच मोलकरणीलाही घरात कोंडून ठेवले होते.