esakal | भांडुप : पूर्व उपनगरात पहिले सुपरस्पेशालिटी रुग्णालय | Hospital
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

भांडुप : पूर्व उपनगरात पहिले सुपरस्पेशालिटी रुग्णालय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भांडुपमध्ये (bhandup) पालिका सुपरस्पेशालिटी रुग्णालय (super specialty hospital) उभारणार आहे. या रुग्णालयात रक्ताच्या कर्करोगावरही (blood cancer) उपचार केले जातील. पुढील तीन वर्षांत हे रुग्णालय उभे राहणार असल्याचा विश्‍वास प्रशासन व्यक्त करीत आहे. हे पूर्व उपनगरातील पहिले सुपरस्पेशालिटी (first hospital) रुग्णालय असेल.
उपनगरीय रुग्णालयाच्या विस्ताराच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पालिका पोहोचली आहे.

हेही वाचा: मुंबई : लवकरच एसटीच्या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या बदल्या होणार

भांडुप येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. ३६० खाटा असलेल्या या रुग्णालयात १४० खाटा या सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी असतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. या रुग्णालयात ऑन्को हॅमिटोलॉजी, ऑन्को सर्जरी म्हणजे कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसह रक्ताच्या कर्करोगावरही उपचार करण्यात येणार आहेत. बालरोग, पोटविकार, मज्जातंतू (न्यूरोलॉजी) अशा शस्त्रक्रियांसह वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. याशिवाय नेहमीच्या कान-नाक-घसा आणि अस्थिव्यंग तसेच इतर आजारांवरही उपचार होणार आहेत.

कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारातही कर्करोगासह इतर गंभीर आजारांवरील उपचारांची सोय करून देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात या आजारांवरील उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो; तर कर्करोगावरील उपचारांसह औषधांचा खर्च १० लाखांच्या वर जातो. मात्र, पालिका रुग्णालयात माफक दरात उपचार होणार आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा ठरणार आहे.

गोवंडीतील शताब्दीचाही विकास

गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. हे रुग्णालय मुंबईच्या प्रवेशद्वारावर असल्याने मुंबईजवळील ग्रामीण भागासाठीही त्याचा फायदा होणार आहे. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्याची सोयही या रुग्णालयात उभी करण्याचा पालिकेचा विचार आहे.

हेही वाचा: नाजूक वयात असलेल्या मुलीला गर्भवती राहण्याची सक्ती नाही : न्यायालय

"उपनगरातील रुग्णव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यात अतिगंभीर आजारांवरील उपचारही होणार असल्याने गरजू रुग्णांना निश्‍चित दिलासा मिळेल. तसेच, उपनगरातील रुग्णांना शहरातील रुग्णालयांत येण्याची गरज भासणार नाही."
- राजूल पटेल, आरोग्य समिती अध्यक्षा.

-२९० खाटा
- ७० अतिदक्षता विभाग
- १३ शस्त्रक्रिया विभाग

loading image
go to top