मुलुंडमधील एटीएममधून चोरट्यांनी 30 लाख काढले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

भांडुप - मुलुंडमधील लोकमान्य टिळक रोड आणि 90 फुटी रोडवरील कोटक महिंद्राच्या दोन एटीएममधून पैसे काढलेल्या नागरिकांच्या खात्यांतून रविवारी (ता. 17) रात्री अचानक पुन्हा कुणीतरी पैसे काढून घेतले.

भांडुप - मुलुंडमधील लोकमान्य टिळक रोड आणि 90 फुटी रोडवरील कोटक महिंद्राच्या दोन एटीएममधून पैसे काढलेल्या नागरिकांच्या खात्यांतून रविवारी (ता. 17) रात्री अचानक पुन्हा कुणीतरी पैसे काढून घेतले.

याविषयीचे एसएमएस मोबाईलवर आल्यावर एकच गोंधळ उडाला असून, नवघर पोलिसांकडे 80 हून अधिक नागरिकांनी तक्रार नोंदवली आहे. यात 30 लाखांहून अधिक रक्कम चोरट्यांनी काढल्याची माहिती असून, प्रत्यक्षात हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. बॅंकेत याविषयी चौकशी केल्यानंतर कोटक महिंद्रा बॅंकेच्या खातेदारांचे पैसे बॅंकेने त्यांना दिले असून, इतर बॅंकांच्या खातेधारकांना मात्र संबंधित बॅंकांनी रीतसर पोलिस तक्रार आणि इतर आवश्‍यक कागदपत्रे दिल्यावर 15 दिवसांत पैसे मिळतील, असे पोलिसांनी सांगितले. हा सायबर क्राइम असून, दिल्लीतील टीमने दोन्ही एटीएमची चाचणी केली आहे. याचा लवकरच उलगडा होईल, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: bhandup mumbai news 30 lakh rupees theft in atm