फोर्टमधील 100 वर्ष जुन्या भानुशाली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्य...

फोर्टमधील 100 वर्ष जुन्या भानुशाली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्य...

मुंबई - फोर्टमधील पाच मजली भानुशाली इमारतीचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. तर चारजण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने ढिगा-याखाली अडकलेल्या  सहा जणांना बाहेर काढले. रात्री  उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. ही इमारत म्हाडाची सेस इमारत असून ती 100 वर्षाची जुनी होती. 2019 साली दुरुस्तीसाठी म्हाडाने एनओसी देऊनही त्याकडे इमारत मालकाने दुर्लक्ष केले. दरम्यान, मालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मागील तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत असून इमारत दुर्घटना घडत आहेत. दुपारी मालाड आणि त्यानंतर काही तासातच फोर्टमधील कबुतरखाना जवळील मिंटरोड येथील  भानुशाली इमारतीच्या शिडीकडील संपूर्ण भाग  कोसळला. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन ढिगा-याखाली अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या ८ फायर इंजिन, दोन रेस्क्यु व्हॅन,10 डंपरच्या सहाय्याने बचावकार्य सुरु ठेवले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 

फोर्ट भागात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. या बिल्डिंगला नोटीस दिली होती. प्रत्येक माळ्यावर 4 ते 5 फ्लॅट होते.  इमारतीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढणे मालकाचे काम होते. पण त्यांनी ते केले नाही. अशा मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे - किशोरी पेडणेकर, महापौर

मदतकार्य करताना अडचणी

पाऊस आणि दाटीवाटीचा परिसर असल्याने दलाला मदतकार्य करताना अडचणी आल्या.  ढिगारा उपसण्याचे काम युध्द पातळीवर सुरु ठेऊन अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत होतं. तळ अधिक पाच मजली असलेली ही इमारत म्हाडाची सेस इमारत आहे. 100वर्षाची जुनी इमारत असून सी-1 कॅटॅगिरीतील होती. इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी म्हाडा आणि पालिकेने एनओसी दिली होती. मात्र संबंधित इमारतीच्या मालकाने दुर्लक्ष केले.

प्रत्येक मजल्यावर चार कुटुंबे राहत होती

धोकादायक इमारत असतानाही इमारतीत रहिवासीही राहत होते. तळ अधिक पाच मजले असलेल्या या इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर वरच्या प्रत्येक मजल्यावर चार कुटुंबे राहत होती. सकाळी इमारतीचा आवाज आल्याने सावध होऊन तळमजल्यावरील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. लॉकडाऊन असल्याने या इमारतीची दुरुस्तीही झाली नाही. इमारतीत बहुतांशी रहिवासी घरीच होते. संध्याकाळी पावणेपाचच्या दरम्यान इमारतीचा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळला. त्यात काहीजण दबले. उर्वरित इमारतीच्या भागात काही रहिवासी अडकले. हा भागही जर्जर असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती.

अग्निशमन दलाने अडकलेल्या 13 जणांना बाहेर काढले

अग्निशमन दलाने अडकलेल्या 13 जणांना बाहेर काढले. ही इमारत म्हाडाची होती. 2019 मध्ये दुरुस्तीची पालिकेने परवानगी दिली होती. तरीही का दुरुस्ती झाली नाही, याबाबत म्हाडा प्राधिकरण चौकशी करेल, असे पालिका इकबाल सिंह चहल यांनी माध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपघातग्रस्त इमारतीची पाहणी करून नागरीकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे आदेश अधिका-यांना दिले.

( संकलन - सुमित बागुल )

bhanushali building collapsed two resident lost their life in this tragedy

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com