esakal | मुंबईत आलेल्या केरळच्या डॉक्टरांची राज्य सरकारवर नाराजी; 'हे' आहे कारण..वाचा संपूर्ण बातमी..  
sakal

बोलून बातमी शोधा

doctors from kerala

कोविड 19 विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना मदत मिळावी म्हणून राज्य शासनाच्या विनंतीवरून केरळमधील 40 डॉक्टर्स आणि 35 परिचारिकांचे पथक मुंबईत दाखल झाले होते.

मुंबईत आलेल्या केरळच्या डॉक्टरांची राज्य सरकारवर नाराजी; 'हे' आहे कारण..वाचा संपूर्ण बातमी..  

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोविड 19 विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना मदत मिळावी म्हणून राज्य शासनाच्या विनंतीवरून केरळमधील 40 डॉक्टर्स आणि 35 परिचारिकांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. मात्र, आता हे पथक अद्याप पगार न दिल्याने घरी परतत आहे. तर, 35 परिचारिका पुढचे किमान 6 महिने मुंबईतच सेवा देणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांसोबत पत्र व्यवहार करून आणखी काही परिचारिका मुंबईत पाठव्यावात अशी मागणी केली आहे. 

केरळातून आलेल्या डाॅक्टरांना पगाराबाबत आतापर्यंत चारवेळा तारीख दिली गेली आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांच्या पगाराचा मुद्दा निकालात काढला गेला नसल्याची खंत व्यक्त करत 25 डाॅक्टर्स उद्या केरळाला परतणार आहेत. तर, 31 जुलैपर्यंत उर्वरित 15 डाॅक्टर्स ही माघारी जाणार असल्याची माहिती केरळ टीम लिडर डॉ. संतोष कुमार यांनी दिली आहे. 

हेही वाचा: निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..

"डाॅक्टरांच्या पगाराबाबत आतापर्यंत चारवेळा तारीख दिली. मात्र अजूनपर्यंत पगार दिलेला नाही. त्यांच्या पगाराचा प्रश्न कुणाचा आहे, आयुक्तांनी अडकवून ठेवले आहे की पालिकेचा प्रश्न आहे? याबाबत माहिती नाही. आतापर्यंत त्यांना प्रवासाचे पैसे ही मिळाले नाही. एकुण 40 डॉक्टर केरळाहून आले होते. 25 डॉक्टर उद्या जात आहे. सर्वच्या सर्व 31 तारखेला परत जाणार आहे," असे केरळच्या डॉक्टरांचे टीम लीडर डॉ. संतोष कुमार यांनी म्हंटले आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झालेल्या केरळमधील कमीतकमी 35 परिचारिकांपैकी एकीला पालिकेकडून वेतन मिळालेले नाही. मुंबईत आलेल्या सर्व 40 डॉक्टरांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. ते दोन महिने काम करणार होते. त्यापैकी पंधरा जणांनी गेल्या आठवड्यात पगाराच्या समस्येमुळे घरी परतण्याचा निर्णय घेतला,” असेही डॉक्टरांनी सांगितले. 

महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारला निवेदन दिल्यानंतर 9 जून रोजी डॉक्टर आणि 35 परिचारिकांची टीम केरळहून मुंबईत दाखल झाली होती. पालिकेने मुंबई शहरातील कोविड रुग्णालय सुरू करण्यास मदत करणे हे त्यांचे काम होते. पालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांना 2 लाख रुपये, एमबीबीएस डॉक्टरांना 80,000 रुपये आणि परिचारिकांना 35 हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा: अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांची तक्रार होती की त्यांना पैसे दिले जात नाहीत किंवा पालिका त्यांच्या प्रवासी खर्चाची भरपाई करत नाही. त्यामुळे, आता या डाॅक्टरांनी पुन्हा केरळला जायचा निर्णय घेतला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

state government did not give  salaries to kerala doctors 

loading image