Bharat Bandh Updates: वाशीच्या APMC मार्केटमध्ये कडकडीत बंद

शरद वागदरे
Tuesday, 8 December 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेत कडकडीत बंद पाळला.

मुंबईः  केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्यााविरोधात झालेल्या देशव्यापी संपात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. यामुळे मुंबई कृषीउत्पन्न बाजर समितीच्या कांदा बटाटा, फळ, भाजीपाला, मसाला आणि धान्य अशा पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता. माथाडी आणि व्यापारी कामागारांनी एकत्र जमून बाईक रॅली देखील काढली होती.

केंद्र सरकारने कृषी आणि पणन कायद्याात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतक-यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कामगार,व्यापारी आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणारे तमाम माथाडी कामगार भारत बंदमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,आमदार शशिकांत शिंदे यांच्या असोसिएशने माथाडी कामगारांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पाचही मार्केट मधील माथाडी आणि व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

देशव्यापी संपास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील बाजार बंद करणार असल्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बाजारामध्ये कृषी माल पाठवू नये असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार बाजारामध्ये गाड्या पाठवण्यात आल्या नाही. लांबपल्ल्यांच्या असणाऱ्या फक्त गाडया बाजारपठेत आल्या एकूण 231 वाहनांची आवक बाजारात झाली होती. भाजीपाला बाजारात 13, कांदा बटाटा मार्केट 39, फळ बाजारामध्ये 43, मसाला मार्केटमध्ये 26, धान्य मार्केटमध्ये 110 गाडयांची आवक झाली. मात्र भाजीपाला व्यतिरिक्त कोणताच माल विक्री करण्यात आला नाही. 

Bharat Band Updates: शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत जागोजागी आंदोलन

 कृषी कायद्यााच्या विरोधात एमपीएमसी बाजारात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असून 14 डिसेंबर रोजी माथाडीच्या मागणीसाठी पुन्हा संप पुकारण्यात येणार आहे.
नरेंद्र पाटील, कामागर नेते
 
भारत बंद मुळे एपीएमसमी मार्केट मध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पाठवू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बाजारपेठेमध्ये लांब पल्याच्या गाडयाव्यतिरिक्त वाहने पाठवण्यात आलेली नाही.
अनिल चव्हाण, सचिव एपीएमसी

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bharat Band Updates Strictly close  APMC market in Vashi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Band Updates Strictly close APMC market in Vashi