Bharat Bandh : उल्हासनगरात काँग्रेसला मनसेची साथ

दिनेश गोगी
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

उल्हासनगर : तब्बल सहा ते सात किलोमीटर पदयात्रा काढून बंदची हाक देणाऱ्या मनसेने पेट्रोल-डिझेल भाववाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात जीव ओतला. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू चौकात आंदोलन केले. काँग्रेसने जाहीर केलेल्या बंदला मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पाठींबा देताना मनसैनिक आंदोलनात सहभागी होतील असे जाहीर केले होते.

त्यानुसार मनसेचे सचिन कदम, प्रदिप गोडसे, बंडू देशमुख, मनोज शेलार, सागर चौहान, प्रमोद पालकर, शैलेश पांडव, बादशाह शेख, अक्षय धोत्रे, सचिन चौधरी, हेमंत मेरवाडे, अशोक गरड, जयराज ससाणे, विजय पवार, बसवराज चलवादी, रिंकू वर्मा, विक्की जिप्सन आदींनी कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनी चौक ते कॅम्प नंबर 1 अशी सहा-सात किलोमीटर पदयात्रा प्रमुख बाजारपेठेतून काढून व्यापाऱ्यांना बंदची हाक दिली.

मनसेच्या या हाकेला प्रतिसाद देताना व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर हरदास माखिजा, मोहन साधवानी, कुलदीप आयलसिंघानी, रोहित साळवे, किशोर धडके, दीपेश हसीजा, मुन्ना श्रीवास्तव, आझाद शेख, कमला मेलकुंदे आदींनी पंडित जवाहरलाल नेहरू चौकात आंदोलन करून घोषणाबाजी केली. दरम्यान रिक्षांचा या देखील या बंदला समर्थन दिल्याने नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh : Congress party with MNS in Ulhasnagar