Bharat Jodo : तपास यंत्रणांचा वापर करून खंडणी उकळण्याचे रॅकेट; गांधींचा गंभीर आरोप

ईडी व सीबीआयच्या छायेत खंडणीचा आरोप; गांधींचा भाजपवर निशाणा
Rahul Gandhi ED CBI
Rahul Gandhi ED CBIsakal
Updated on

Thane News: ईडी, सीबीआय यांसारख्या महत्वाच्या तपास यंत्रणांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून दबाव टाकून भाजपचे विविध कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड ( निवडणूक रोखे) च्या माध्यमातून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.(bharat joda yatra thane news)

तसेच इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली आहे. आता, तेच या खंडणी प्रकरणाचे करविते असल्याचा आरोप देखील गांधी यांनी यावेळी केला. शुक्रवारी भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल झाली.

शहरात यात्रा काढून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना संबोधले, त्यानंतर भिवंडी सोनाळे येथे येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.(rahul gandhi on modi in thane)

Rahul Gandhi ED CBI
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींसाठी नाशिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाकडून कंपन्यांना कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून त्या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्या माध्यमातून भाजप खंडणी उखळते. याचे उदाहरण म्हणजे शेल कंपनी आहे.

बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच इलेक्ट्रॉल बॉन्ड हा भ्रष्टाचाराचे मोठे कुराण असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपचे सरकार कधी न कधी जाईल आणि आमचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी या घोटाळ्याची चौकशी करून अशी कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही, असा गंभीर इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.(rahul gandhi on ED Cbi Thane)

Rahul Gandhi ED CBI
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

दरम्यान, ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा आता देशाच्या राहिलेल्या नाहीत. या यंत्रणा आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करीत आहेत. या या यंत्रणांनी त्यांचे काम केले असते तर इलेक्ट्रॉल बॉन्डहा घोटाळा झालाच नसता, असे देखील त्यांनी

यावेळी नमूद केले. मुळात इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करविते आहेत असे संगत, यामध्ये नितीन गडकरी यांचा काहीच संबंध नसल्याचे देखील राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पैशातूनच पक्षात फुट पडली

भाजपने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कामविलेल्या पैशाच्या जोरावर त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पक्षात फूट पडली. तसेच पैसे आणि तपास यंत्रणाकडून दबाब टाकून भाजपने महाराष्ट्रातील सरकार पाडले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi ED CBI
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

भिवंडीत कॉँग्रेसचे शक्ति प्रदर्शन

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने भिवंडी शहरातील रस्त्यांवर जागोजागी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच यात्रेच्या स्वागतासाठी चौकाचौकात कार्यकर्त्यांचे जथे जमले होते. यामुळे यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले. देशात सरकार आल्यावर जातनिहाय गणना आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच देशातील विविध कंपन्याने संस्थांचाही सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली. (rahul gandhi ED CBI Bhiwandi news)

बेरोजगार लोक, विभक्त गरीब आदिवासी समाज, गरीब सामान्य जातीचे लोक येथे मतदार आहेत. तुमच्यासाठी नरेंद्र मोदीजींनी काही केले, कर्ज माफ केले, जीएसटी लागू केली, नोटा बंदी केली आणि जे छोटे उद्योग चालवतात, छोटे मध्यम उद्योगधंदे करतात, मतदाता आहेत. त्यांचे सर्व व्यवसाय बंद केले. छोटे दुकानदार, व्यावसायिकांना उद्ध्वस्त केले आहे. कारण, त्यांना सर्वात मोठ्या अरबांना मदत करायची आहे.(rahul gandhi in Bhiwandi )

Rahul Gandhi ED CBI
Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : गांधींचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

म्हणून हा माझा तुम्हाला संदेश आहे, तुम्हा लोकांना जागरूक व्हावे लागेल.रोज तुमच्या खिशातून पैसे काढून ३० लोकांच्या खिशात जात आहेत. ज्या दिवशी तुम्ही ९० टक्के जागे व्हाल, तेव्हा हे सर्व थांबेल आणि भारताचे राजकारण बदलेल.

तुम्ही मला विचाराल पहिली पायरी म्हणजे जनगणना, प्रत्येकाची मोजणी, या देशात किती आदिवासी, किती गरीब सामान्य जाती, किती अल्पसंख्याक, त्यानंतर आज आर्थिक आणि भारतातील प्रत्येक संस्थेचे सर्वेक्षण,मोठमोठ्या उद्योग कंपन्यामध्ये, मिडीयामध्ये किती, यावरुन सत्य समोर येईल. तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही जात जनगणना करू, आम्ही आर्थिक सर्वेक्षण करू आणि आमच्या देशातील सर्व संस्थांचे सर्वेक्षण करू, भारतात क्रांतिकारी काम होणार, परिवर्तनाला सुरुवात होईल असे देखील राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi ED CBI
Bharat Jodo Nyay Yatra : आदिवासींची जमीन उद्योगपतींना; राहुल गांधी यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com