विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

मुंबईः भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी  आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र  या यादीतून कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुणकर्णी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार, तर उत्तर प्रदेशातील नऊ जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आलेत. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. गेल्यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. तर पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. तसंच या जागेसाठी  महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना संधी दिली आहे. शिरीप बोराळकर हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तसंच संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता.

Bharatiya Janata Party releases names of candidates for biennial elections Maharashtra Legislative Council

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com