भारतीय कामगार सेनेची उल्हासनगर पालिकेवर धडक

दिनेश गोगी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी सरसावलेल्या शिवसेना भारतीय कामगार सेनेने आज उल्हासनगरात धडक देऊन आयुक्तांना जाब विचारला. उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर असणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी हे कंत्राट पद्धतीवर काम करत आहेत. आग लागो, झाड पडो की आणखीन काही आपात्कालीन घटनेत या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पडावे लागते. मात्र त्यांना कायमस्वरूपी कामावर घेतले जात नाही. 

इतर महानगरपालिका प्रमाणे उल्हासनगरातही हीच परिस्थिती असून कर्मचारी न्यायहक्का पासून वंचित राहत आहेत. शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेना व मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी आज अनपेक्षितपणे उल्हासनगर महानगरपालिका गाठली. आयुक्त गणेश पाटील यांना जीवाची बाजी पणाला लावणाऱ्या कंत्राटी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी का करत नाही. असा जाब विचारल्यावर पालिकेत अनेक जागा रिक्त असून त्याअनुषंगाने नोकर भरती करायची आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाने त्यास मंजुरी दिल्यास प्रथम प्राधान्य हे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार. त्यांचे प्रश्न सोडवले जाणार. असे आश्वासन गणेश पाटील यांनी सूर्यकांत महाडिक यांना दिले. 

यावेळी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शरद कुवेस्कर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस नारायण चव्हाण, पदाधिकारी घोसाळकर, उतेकर, कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपविभाग प्रमुख दीपक साळवे, युवासेनेचे रविंद्र निकम उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, वसई-विरार, उल्हासनगर या महानगरपालिका मध्ये कार्यरत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेने कंबर कसल्याही प्रतिक्रिया सूर्यकांत महाडिक यांनी व्यक्त केली. 

Web Title: Bhartiy Kamgar Sena went in ulhasnagar municipal corporation