शिवसेना प्रवेशावर भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

मयुरेश पाटणकर
रविवार, 25 ऑगस्ट 2019

गुहागर - राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून आले असे वृत्त आज दुपारपासून माध्यमांमध्ये पसरले आहे, मात्र आपण कोणालाही भेटायला गेलो नव्हतो. शिवसेनेत किंवा अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण आमदार भास्कर जाधव यांनी सकाळ शी बोलताना केले. 

लोकसभा निवडणुकीनंतर आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी सोडणार अशा अफवांचे पिक आले होते, मात्र त्यावेळेला ही त्यांनी पक्षांतराचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. मध्यंतरी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवेश केला. त्यावेळीही कोकणातील एक नेता भाजप किंवा शिवसेना या पक्षात जाणार अशी चर्चा होती. आमदार भास्कर जाधव चिपळुणातून व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या दोन जागा जो पक्ष देईल, त्या पक्षात जाधव प्रवेश करणार अशीही चर्चा होती.  

रविवारी दुपारनंतर आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला भास्कर जाधव यांच्या रूपाने आणखी एक हादरा बसणार. जाधव यांची घरवापसी होणार. अशा राजकीय चर्चांनीही जोर धरला. मात्र आमदार जाधव यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले.

आमदार जाधव म्हणाले, मी कुठेही गेलेलो नाही. दिवसभर मुंबई येथील निवासस्थानी विश्रांती घेत होतो. माध्यमातून दाखविले जाणारे वृत्त खोटे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaskar jadhav may enters in shivsena