

Bhayandar Crime
ESakal
भाईंदर : भाईंदर पूर्व येथे एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता २८ एप्रिलला आपल्या मित्राच्या घरी गेली होती. त्या वेळी मित्राचा आणखी एक मित्र त्या ठिकाणी होता. त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केले.