

An elderly patient admitted to the ICU in a Bhayandar hospital reportedly suffered multiple injuries after rats bit her hands while she was on a ventilator, exposing serious hospital hygiene and negligence concerns.
esakal
भाईंदर येथील एका रुग्णालयात संतापजनक घटना समोर आली आहे. अतिदक्षता विभागातही रुग्ण सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय वृद्ध महिलेचे शरीराला उंदरांनी कुरतडले. विशेष म्हणजे, या घटनेची डॉक्टरांना, परिचारिकांना किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना साधी पुसटशीही कल्पना नव्हती. नातेवाईकांच्या सतर्कतेमुळेच ही घटना उघडकीस आली; त्यांनी हा प्रकार पाहताच तत्काळ आरडाओरडा करत प्रशासनाला सावध केले. मात्र, तोपर्यंत उंदरांनी त्या वृद्ध महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा केल्या होत्या.