'जावेद अख्तर, आमिर खानसह दाढीवाले आणि गोल टोपी घालणारे लोक मराठी बोलतात का? मनसेच्या 'त्या' कृतीवर नीतेश राणेंचा संताप
Bhayandar Assault, Marathi Language Dispute : राणेंनी स्पष्ट इशारा दिला की, 'हे हिंदुत्ववादी सरकार आहे. कोणीही भाषेच्या नावाखाली मारहाण केली, तर सरकार कडक कारवाई करेल. सरकार अशा प्रकाराला कदापिही पाठीशी घालणार नाही.'
ठाणे (महाराष्ट्र) : भाईंदरमध्ये एका फूड स्टॉल मालकाला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून, भाजप मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.