Manoj Jarange PatilESakal
मुंबई
Manoj Jarange News: भीम आर्मीचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Manoj Jarange Patil Updates: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. भीम आर्मीचाही या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी ते दाखल झाले असून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी हजारो मराठा बांधव देखील मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला अनेक नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत असून भीम आर्मीचाही मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

