Crime News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची ६ वर्षांनी सुटका

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी 4 एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आरोपी शोमां सेन यांना जामीन मंजूर केला होता प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता |
Crime News
Crime Newssakal

Mumbai News: भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची भायखळा येथील महिला कारागृहातून 6 वर्षांनी सुटका झाली.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी 4 एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आरोपी शोमां सेन यांना जामीन मंजूर केला होता प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

Crime News
Crime: सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन काढल्याचा आला राग; दाम्पत्यावर केला जीवघेणा हल्ला

एनआयएने पुरव्या अभावी कारवाई केल्याचा आरोप जामीन अर्जात करत जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.2018 पासून शोमा सेन या मुंबईच्या भायखळा येथील महिला तुरुंगात न्यायालयातील कोठडीत आहेत

भीमा कोरेगावर-एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याचा आणि भीमा कोरेगावर हिंसाचारात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक शोमा सेन यांच्यासह 14 आरोपीवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल झाला होता.

Crime News
Crime News: पोलिसांनी घेतला 4 महीने शोध, अखेर अशा प्रकारे केली अटक

या प्रकरणातील इतर आरोपींपैकी वकील सुधा भारद्वाज, कवी-लेखक पी. वरावरा राव, नागरी हक्क कार्यकर्ते डॉ आनंद तेलतुंबडे, कामगार कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस, वकील अरुण फरेरा यांचा समावेश आहे. फरेरा यांना आतापर्यंत जामीन मिळाल होता. आणखी एक सहआरोपी, आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि फादर स्टॅन स्वामी यांचाही समावेश होता. सात महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर तिथेच जून 2021 मध्ये कोविडमुळं त्यांचं निधन झालं.

Crime News
Crime News : भरदिवसा घरफोडी! सात तोळे सोने अन् रोख रकमेसह चोरटे लंपास

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com