...तर आदित्य ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane-Aditya Thackeray
Nitesh Rane-Aditya Thackeraygoogle
Updated on

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात (Worli Cylinder Blast Case) आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर या कुटुंबातील एका मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Minister Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Nitesh Rane-Aditya Thackeray
प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा, थेट पत्र पाठवून व्यक्त केली खंत!

महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले.

नेमकी काय आहे घटना? -

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बीडीडी चाळीतील एका घरात सिलिंडर स्फोट झाला होता. त्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमींना सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र नायर रुग्णालयात त्यांना तत्काळ उपचार मिळाले नसल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पालिकेने एक डॉक्टर, एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित केले. या प्रकरणात पालिकेने चौकशी समितीही नियुक्त केली आहे. या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा वाचला असून त्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बालकाचा एक डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ डिसेंबरला २७ वर्षीय आनंद पुरी यांचा मृत्यू झाला होता, तर आज २५ वर्षीय विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. त्या या स्फोटात ५० ते ६० टक्के भाजल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Wari Live Updates
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja
Dr. Shirish Valsangkar
Marathi News Esakal
www.esakal.com