
भिवंडीत दोघांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांची हत्या झालीय. भिवंडीतील खारबाव चिंचोटी रस्त्यावर खार्डी इथं घडलेल्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हल्ला कुणी आणि का केला हे अद्याप समोर आलं नाहीय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.