esakal | झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची भिवंडीत हत्या | Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची भिवंडीत हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : शहरातील श्रीरंग नगर परिसरात झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून भरदिवसा एकाची हत्या (murder) करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १३) दुपारी घडली.
राजेंद्रप्रसाद शांतीप्रसाद वर्मा (वय ३२) असे मृत कामगाराचे नाव असून या प्रकरणी आरोपी राजू उर्फ सहाजराम रामदास चौहान याला शहर पोलिसांनी अटक (culprit arrested) केली आहे. मृत राजेंद्रप्रसाद आणि आरोपी राजू हे दोघेही बेघर असून दिवसभर मोलमजुरी करतात आणि रात्री रस्त्याकडेला झोपतात.

हेही वाचा: कुलगुरुंनी महागाड्या गाड्या घेतल्या असतील तर माहिती घेऊ - उदय सामंत

झोपेच्या जागेवरून त्यांच्यात वाद झाल्याने राजूने धारदार शस्त्राने भररस्त्यात राजेंद्रप्रसादवर वार केले. या घटनेत राजेंद्रप्रसाद याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नागरिकांनी आरोपीस पकडून ठेवत पोलिसांना कळवले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

loading image
go to top