भिवंडीत भीषण आगीत भंगाराची गोदामे खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

भिवंडी - वन विभाग व महापालिकेच्या नागाव येथील आरक्षित जागेवर बेकायदा अतिक्रमण करून उभारलेल्या भंगार गोदामांना बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत 15 गोदामे व पत्र्याच्या सहा झोपड्या भस्मसात झाल्या. आगीची चाहूल लागल्यानंतर गोदामातील कामगार व झोपड्यांमधील रहिवासी बाहेर पडल्यामुळे बचावले.

भिवंडी शहरातील नागाव परिसरातील गायत्रीनगरमध्ये सरदार कंपाऊंडमध्ये गोदामे उभारण्यात आली आहेत. या गोदामांमध्ये प्लॅस्टिकच्या टाकाऊ सामानासह धाग्यांचे लोचन, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि लोखंडी भंगार साठविले जात होते. आज पहाटे साडेचारच्या सुमारास सुरवातीला प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागली. वाऱ्यामुळे काही मिनिटांतच शेजारील गोदामांमध्ये आग पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व महापालिकेच्या अग्निशामक दलाची पथके घटनास्थळी पोचली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. नागरिकांच्या मदतीने सात तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले. बोलाविले. तोपर्यंत मात्र 15 गोदामे व पत्र्याच्या सहा झोपड्या खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

अहवाल देण्याचा आदेश
या आगीची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना जागेसंदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित जागा महापालिकेने आरक्षित केली असून, काही वर्षांपासून बेकायदा अतिक्रमण केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Web Title: bhivandi news mumbai news fire scrab godown loss