esakal | आईचे प्रेमसंबंध उघड करणाऱ्या मुलाची आचाऱ्याने केली हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आईचे प्रेमसंबंध उघड करणाऱ्या मुलाची आचाऱ्याने केली हत्या

आईचे प्रेमसंबंध उघड करणाऱ्या मुलाची आचाऱ्याने केली हत्या

sakal_logo
By
दीनानाथ परब

भिवंडी: वडिलांना आईच्या प्रेमसंबंधांची (love affair) माहिती दिली म्हणून एका आठ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. भिवंडीमध्ये (bhiwandi) ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी (police) या प्रकरणी २१ वर्षीय आरोपीला (accused arrested) अटक केली आहे. त्याने त्याच्या प्रेयसीच्या मुलाची हत्या केली. आरोपी भिवंडीतील या कुटुंबाच्या घरी आचारी म्हणून नोकरी करत होता. (Bhiwandi Boy tells dad of mother’s affair is killed dmp82)

आचाऱ्याबरोबर असलेल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल समजल्यानंतर पतीने आरोपी जितेंद्र माद्देशियाला नोकरीवरुन काढून टाकले होते. पोलिसातील सूत्रांनी ही माहिती दिली. मुलगा गुरुवारपासून घरातून बेपत्ता होता. त्यानंतर अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. मुलाचे कुटुंब ज्या इमारतीत राहते, त्याच इमारतीमधील एक बंद फ्लॅटमध्ये शुक्रवारी सकाळी मुलाचा मृतदेह सापडला.

हेही वाचा: वाढदिवस साजरा करणार नाही; फडणवीसांनंतर अजितदादांचाही निर्णय

जितेंद्र माद्देशिया या कुटुंबाच्या घरी नोकरीला होता व अलीकडेच त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी जितेंद्र माद्देशियाला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने मुलाने त्याचे प्रेमसंबंध उघड केले म्हणून त्या रागातून मुलाची हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती अधिकारी प्रदीप गुप्ता यांनी दिली.

loading image