Bhiwandi Crime: ऑनड्युटी अचानक गायब, ३० तासांपासून बेपत्ता; विजय सेल्सच्या वॉचमनचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?

Vijay Sales Watchman Found Dead : विजय सेल्सच्या वॉचमनचा पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Vijay Sales Watchman Found Dead

Vijay Sales Watchman Found Dead

ESakal

Updated on: 

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय सेल्समध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. मागील ३० तासांपासून ते बेपत्ता असून त्यांचा शोध घेत असताना साडेसहा फूट खोल पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...