Bhiwandi News: भिवंडीत राडा! दिंडीगडावर मांसाहार नेल्याने दोन गट भिडले, हाणामारीत सहा जखमी

Bhiwandi Dindigad: भिवंडीत दिंडीगड डोंगरावर दोन गटांत मोठा वाद झाल्याची घटना घडली. तसेच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यामुळे सहा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Bhiwandi Dindigad clash

Bhiwandi Dindigad clash

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडी शहराजवळील दिंडीगड डोंगरावर रविवारी दुपारी दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर जखमींना उपचारासाठी आणलेल्या भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com