MNS leaders confronting a rickshaw driver in Bhiwandi after he assaulted a Marathi youth : राज्यात सध्या मराठी-परप्रांतीय वादाने राजकारण तापले असताना भिवंडीत एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करत रिक्षाचालकाला माफी मागायला भाग पाडले. या घटनेने पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय तणाव चर्चेत आला आहे.