महापौरपदासाठी नऊ, उपमहापौरपदासाठी आठ अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

भिवंडी - भिवंडी शहर महापालिकेच्या 9 जूनला होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 4) कॉंग्रेस, शिवसेना व भाजप, कोणार्क विकास आघाडीतर्फे नगरसेवकांनी नगर सचिव अनिल प्रधान यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. महापौर पदासाठी 9, तर उपमहापौर पदासाठी आठ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल झाले. महापौर व उपमहापौर या निवडणुकीत शिवसेना विटो पॉवर मुख्य भूमिकेत रोल अदा करणार असल्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, नेत्यांना घाम फुटला आहे. 

भिवंडी महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने 90 पैकी 47 जागा मिळवत बहुमत मिळवले आहे; तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 12 जागा मिळाल्या आहेत. भिवंडी पालिकेत सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसने तयारी सुरू केल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी भाजपने कोणार्क विकास आघाडी आरपीआय व अपक्ष नगरसेवकांशी संपर्क करून इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. 9 जूनला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाले. महापालिकेत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गर्दी केली होती. महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक विलास आर. पाटील, भाजपचे सुमित पाटील, प्रकाश टावरे, शाहीन फरहान सिद्दीकी, कॉंग्रेस जावेद गुलाम मो. दळवी (अर्ज 3), शिवसेना तुषार चौधरी, मदन नाईक यांनी, तर समाजवादी पक्षाचे अब्बास अली जलीला अ. अन्सारी, कोणार्क विकास आघाडीचे नितीन आर. पाटील, भाजप शाहीन फरहान सिद्दीकी, हनुमान चौधरी, शिवसेना मनोज काटेकर (अर्ज 2), कॉंग्रेस प्रशांत लाड, मदन नाईक यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले. या वेळी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, शहर अध्यक्ष संतोष शेट्टी, कॉंग्रेस अध्यक्ष शोएब खान, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक मनोज काटेकर उपस्थित होते. 

भाजपसमोर आव्हान 
राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेने महापौर पदासाठी भाजपला भिवंडीत पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे; मात्र अद्याप शिवसेनेने याला होकार दिला नसल्याने भाजप गटात नाराजी आहे. शिवसेना कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे. कॉंग्रेसच्या प्रस्तावासाठी शिवसेनाही अनुकूल दिसत आहे; मात्र आज महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेनेने उमेदवारांना रिंगणात उतरवून कॉंग्रेसला इशारा दिला आहे. असे असले तरी शिवसेना आम्हाला पाठिंबा देईल, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे नेते जावेद दळवी यांनी दिली. 

Web Title: bhiwandi municipal corporation election