
भिवंडी : भिवंडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही जैन धर्मीयांचा ‘पर्युषण पर्व’ मोठ्या श्रद्धेने साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री समस्त जैन महासंघाच्या मागणीनुसार २० ते २७ ऑगस्ट या सात दिवसांत शहरातील सर्व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश भिवंडी महापालिकेने दिले आहेत. यास विरोध करणाऱ्यांवर पोलीस कारवाईसाठी महापालिकेने पथक स्थापन केले आहे.