

Bhiwandi Municipal Corporation
ESakal
भिवंडी : महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असते. मात्र, २४ उमेदवारांनी अद्यापही त्यांच्या खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. परिणामी, निवडणूक खर्च तपासणी पथकाच्या प्रमुखांनी या सर्वांना नोटिसा बजावल्या असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.