भिवंडी पालिकेला `अभय` फळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

भिवंडी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करवसुलीसाठी सुरू केलेल्या "अभय योजने'त 52 दिवसात 25 कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत आतापर्यंत 38 कोटींचा कर वसूल करण्यात पालिकेला यश आल्याची माहिती पालिका उपाआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

भिवंडी : भिवंडी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करवसुलीसाठी सुरू केलेल्या "अभय योजने'त 52 दिवसात 25 कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत आतापर्यंत 38 कोटींचा कर वसूल करण्यात पालिकेला यश आल्याची माहिती पालिका उपाआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

या कारवाईत 1 हजार 297 नळ जोडण्या कापण्यात आल्या. तर 639 जणांची मालमत्ता (प्रॉपर्टी) नोटीस बजावत सिल करण्यात आली आहे. या योजनेचा 22 हजार नागरिकांनी लाभ घेतला असून या करवसुलीमुळे पालिकेच्या तिजोरीत आणखी भर पडली आहे. 

मुंबईकर आता ऑफिसला लवकर पोहोचणार

भिवंडी पालिकेची 386 कोटी 51 लाख 77 हजार 225 रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. करवसुलीसाठी 10 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत पालिकेने "अभय' योजना सुरू केली. ही योजना सुरू होताच 52 दिवसात 24 कोटी 99 लाख 39 हजार 57 रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

यामध्ये 6 कोटी 4 हजार 185 रुपये व्याज माफ करण्यात आले. पालिकेच्या प्रभाग 3 मध्ये अधिकारी सुदाम जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक 6 हजार 68 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका उपायुक्ता वंदना गुळवे यांनी दिली. 

मुंबई होणार आता आनंदी शहर, कसे ते वाचा...

पालिकेचे 125 जणांचे पथक कर वसुलीसाठी परिश्रम घेत आहे. दरम्यान, आतापर्यंत या अभय योजनेतून सुमारे 38 कोटी रुपयांची वसुली झाली असून हा आकडा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भिवंडीकरांना मूलभूत सुविधा देण्यासाठी थकीत कर वसुलीकडे प्रशासनाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. प्रवीण आष्टीकर 
पालिका आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi Municipality's got Success in 'Abhay' scheme!