esakal | मुंबई होणार आता आनंदी शहर, कसं ते वाचा

बोलून बातमी शोधा

file photo

शहर एचआयव्ही, मलेरिया, डेंगी लेप्टोसारख्या आजारापासून मुक्त होणार आहे. 

मुंबई होणार आता आनंदी शहर, कसं ते वाचा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हवामान बदलावर मात करून शहर आनंदी बनविण्याचा आणि मुंबई आपत्तीशी सामना करण्यासाठी "मुंबई 2030' चा संकल्प पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोडला आहे. या संकल्पाचा भाग म्हणून शहर एचआयव्ही, मलेरिया, डेंगी लेप्टोसारख्या आजारापासून मुक्त होणार आहे.

हे ही महत्‍वाचे...काँग्रेस म्‍हणतयं आमच ठरलयं


मुंबईत प्रवासाचा सरासरी वेग ताशी 20 किलोमीटर आहे तो 40 किलोमीटर पर्यंत वाढविणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सध्या असलेले 10 टक्के प्रवासी 20 टक्‍क्‍यांपर्यंत नेणे, मुंबईकरांना 5 हजार 910 दशलक्ष लिटर पाण्याची व्यवस्था करणे, शहराला पूर आणि आपत्तीपासून मुक्त करणे, वनीकरणाद्वारे झाडांच्या संख्येत वाढ करून कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण कमी करणे,

100 टक्के मलजलावर प्रक्रिया करून त्यापैकी 50 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे, मुंबईचा समुद्र, नद्या, तलाव स्वच्छ करणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करून ते 5 हजार टनापर्यंत आणणे, कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी 1200 क्षमतेचा प्रकल्प उभारणे, लहान मुलांना शंभर टक्के लस पुरविणे, शहर एचआयव्ही, मलेरिया, डेंगी, लेप्टोसारख्या आजारापासून मुक्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 

हे ही महत्‍वाचे...प्रवाशांना एसी लोकल नको. आहे त्‍यातच सुधारणा करण्‍याची मागणी

हवामान बदलांवरील उपायांसाठी प्रयत्न 
शहर आणि उपनगरातील रस्ते सुधारणासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भांडवली खर्चात 76 कोटी रुपयांची वाढ केली आहे. पाणीपुरवठ्यात 69 टक्के वाढ झाली आहे. जागतिक हवामान बदलामुळे मुंबईवर विपरित परिणाम होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. 

पावसाचे पाणी साठविण्यासाठी टॅंक 
शहरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले, हे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळत आहे. त्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टॅंक बांधण्यात येणार आहेत. बोगदे आणि उदंचन प्रणाली यामुळे पूर नियंत्रण करणे शक्‍य होईल, असेही अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यासाठी जापनिज इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. या प्रस्तावास केंद्र सरकाने मंजुरी दिली आहे. 

25 हजार झाडे कापली 
प्रकल्पांमध्ये अडसर ठरणारी 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. यंदा आणखी 3236 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. वर्षभरात चार लाख झाडे लावून तोडलेल्या झाडांचे झालेले नुकसान भरून काढण्यात येईल.