विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे- कपिल पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

भिवंडी - केंद्र व राज्य सरकारने तालुक्‍यासाठी मेट्रो रेल्वेसह २१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त विकास प्रस्ताव तयार करावेत, त्याला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी (ता. २९) येथे दिले. शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्यास शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्‍वास पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

भिवंडीतील मुख्य रस्ता असलेल्या अंजूर फाटा ते वंजारपाटी नाक्‍यापर्यंतच्या सुमारे ४८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अंजूर फाटा येथील गिरीराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमास आमदार महेश चौघुले, महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर, महापालिका डॉ. आयुक्त योगेश म्हसे, भाजप शहराध्यक्ष एस. शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील, नारायण चौधरी आदींसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. 

काही वर्षांपासून अंजूर फाटा ते वंजारपाटी नाक्‍यापर्यंतच्या रस्त्यासाठी काँक्रीटीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. त्यातून त्यांनी या रस्त्यासाठी तब्बल ४८ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या रस्त्याप्रमाणेच राज्य सरकारने भिवंडी शहरातील ५३ रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. या कामांचेही लवकरच भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा खासदार पाटील यांनी केली. लॉजिस्टिक पार्कसाठी २० हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार झाला आहे. शहरात आणखी पाच नवे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. उड्डाणपूल आणि रस्त्यांसाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी प्रास्ताविक केले.

महापौरांचे गौरवोद्‌गार 
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्याविषयी काँग्रेसचे महापौर जावेद दळवी यांनी गौरवोद्‌गार काढले. खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वामुळे भिवंडीचा विकास होत आहे. त्यांचा राजकीय अनुभव हा शहरासाठी फायदेशीर ठरला आहे, असे महापौर दळवी यांनी या वेळी सांगितले.

Web Title: bhiwandi news kapil patil