
Varhala Lake in Bhiwandi pollution
ESakal
भिवंडी : भिवंडी शहरातील ऐतिहासिक व एकमेव पर्यटनस्थळ असलेल्या वऱ्हाळा तलावात तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट सांडपाणी मिसळत असल्याने तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामतघर ग्रामस्थांनी तेजस मनोज काटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी येत्या १५ दिवसांत तलावातील दुर्गंधी बंद करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तलावाचे व्यवस्थापन कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावे, असा इशारा दिला आहे.