भिवपुरीत रेल्वेची नवीन कारशेड

भिवपुरीत रेल्वेची नवीन कारशेड

मुंबई: मध्य रेल्वेवर काही दिवसांत वातानुकूलित (एसी) लोकल येणार असून, पनवेल-अंधेरी लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत होणार आहे. त्यामुळे या लोकलची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवर भिवपुरी येथे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) जमिनीची पाहणी केली आहे.

उपनगरी लोकलचा विस्तार वाढत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तीन मार्गांत नेरूळ-बेलापूर-खारकोपर या चौथ्या मार्गाची भर पडली आहे. काही दिवसांतच मध्य रेल्वेवर पहिली एसी लोकल सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल ते गोरेगाव अशी थेट लोकल धावणार आहे. त्यामुळे या लोकलची देखभाल आणि दुरुस्तीसाठी नवीन कारशेडची आवश्‍यकता आहे. म्हणून एमआरव्हीसीतर्फे भिवपुरी येथे नवीन कारशेड उभारण्यात येणार आहे.

या कारशेडमध्ये 60 लोकल उभ्या करण्याची क्षमता असेल. मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण 238 एसी लोकल प्रस्तावित आहेत. यात एमयूटीपी-3 मधील 47 आणि एमयूटीपी-3 अ मधील 191 एसी लोकलचा समावेश आहे. या एसी लोकलची बांधणी लातूर येथील कारखान्यात करण्याचा प्रस्ताव आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com