डोंबिवली : आजारातून बरं करण्यासाठी भोंदूबाबाने मागितली सोन्याची जीभ

crime
crimesakal media

डोंबिवली : डोंबिवलीतील एका कुटुंबाला जळगावच्या भोंदूबाबाने (Bhondubaba) ३२ लाखाला गंडा (Money fraud) घातला आहे. याप्रकरणी पवन पाटील (Pawan patil arrested) या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांच्या वडीलांना बरे करण्यासाठी पवनने त्यांना देवाला सोन्याची जीभ (Golden toung) ओवाळून टाकावी लागेल अशा भूलथापा दिल्या असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी रामनगर पोलिसांचे (Ramnagar police) एक पथक जळगावला (Jalgaon) रवाना झाले असून त्यांनी ८ ते १० तोळे सोने हस्तगत केले आहे. (Bhondubaba told victim to get gold toung for worship of god in superstition crime)

crime
एकाच रात्री सहा दुकाने फोडली; उल्हासनगरातून २४ तासांत त्रिकुटाला अटक

डोंबिवलीतील एका कुटुंबाला जळगाव येथील पवन पाटील या भोंदूबाबाने ३२ लाखाला गंडा घातला आहे. प्रियंका राणे यांच्या तक्रारीवरुन पवन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलिसांनी सुरु केला असून जळगाव येथे पोलिसांचे एक पथक अधिक तपासासाठी रवाना करण्यात आले आहे. या पथकाने पवन याचे बॅंक अकाऊंट फ्रिज केले असून त्यामध्ये दहा ते अकरा लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पथकाने 8 ते10 तोळे सोने देखील रिकव्हरी केले असल्याची माहिती रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

- फिर्यादी यांचा जॉब गेला होता, त्यात त्यांच्या वडीलांची तब्येत ठिक नव्हती. पवन याने वडीलांना बरे करण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या कुटूंबियांना सांगितले की देवाला सोन्याची जीभ ओवाळून टाकावी लागेल. तसेच त्यासाठी घरात होम हवन करण्यास सांगितले. ही सोन्याची जिभ सव्वा पाच ग्रॅमची सोन्याची होती अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

- आरोपीचा मित्र राकेश पाटील याने फिर्यादी यांना फोन करुन हा भोंदूबाबा असून त्याच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. प्रियंका यांनी त्यानुसार माहिती काढली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com